Wed. Dec 8th, 2021

मुख्यमंत्र्यांविरोधात यवतमाळ जिल्ह्यात तीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जोड्याने मारण्याची भाषा केली होती. त्यामुळे चिथावणीखोर वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठीक ठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या आहेत.

पोलीस प्रशासनाने यावर कारवाई केली नाही तर आम्ही कोर्टात दाद मागू असा इशारा भाजपाकडून देण्यात आला आहे. शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपा आता स्वस्थ बसणार नाही असे दिसून येत आहे. शिवसेनेने भाजपाविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर आता भाजपानेदेखील प्रत्युत्तर देण्याचे ठरविले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ३ पोलीस ठाण्यात भाजपाने उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. त्याबाबतची माहिती भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली आहे.

‘शिवरायांना राज्याभिषेक करताना तिथून इथे गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला. आणि हा योगी आला. म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला. सरळ चपला घालून! असं वाटलं त्याच चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाड फोडावं’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याच वक्तव्यावरुन आता भाजपाने तक्रार दाखल केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *