Fri. Aug 12th, 2022

भर सभेत भाजप नेत्याची घरसली जीभ, बलात्कारावर केलं खळबळजनक वक्तव्य

राज्यातील नेतेमंडळींची भर सभेत जीभ घसल्याच्या अनेक घटना आपल्या वाचण्यात येतात. काही नेते असा प्रकार मुद्दाम नाव चर्चेत येण्यासाठी करतात. असा प्रश्न नक्कीच यातून निर्माण होतो. दरम्यान अशीच एका भाजप नेत्याची जीभ घसरल्याचा प्रकार हिंजवाडी येथे घडला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

महिलांवरील बलात्कार हा शब्द इतका स्वस्त झाला आहे की, त्याचा संदर्भ कुठेही दिला जातो. एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर तिच्या एकटीचे आयुष्य उध्वस्थ होतं. पण कंपनीचे मालक कामगारांवर अन्याय करत एका अर्थाने बलात्कार करत आहेत. त्यातून कामगारांचं अख्ख कुटुंब उध्वस्थ झाल आहे. असं संदर्भहीन आणि संतापजनक वक्तव्य भाजपचे कामगार नेते आणि भाजप प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केलं आहे.

हिंजवडी येथील एका नामांकित कंपनीने एकोणीस कायमस्वरूपी कामगारांचे जबरदस्तीने राजीनामे घेतले. याप्रकरणी तक्रारी देऊनही पोलिसांनी या पांढरपेश्यांवर कारवाई केली नाही. असा आरोप त्यांनी यावेळी केला.

संबंधित कंपनीने कामगारांवर हा अन्याय करत, एका अर्थाने त्यांच्यावर बलात्कार केला आहे. एखाद्या स्त्री वर बलात्कार झाला तर तिच्या एकटीचं आयुष्य उध्वस्थ होतं, पण इथं कंपनीने कामगारांवर केलेल्या बलात्काराने अख्ख कुटुंब उध्वस्थ केलं आहे. असं खळबळजनक वक्तव्य भोसलेंनी केलं आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी गेल्याच महिन्यात यशवंत भोसलेंनी आयोजित केलेल्या कामगार मेळाव्याला उपस्थिती दर्शवली होती. त्यामध्ये प्रदेशाध्यक्षांनी भोसलेंबाबत गुणगान ही गायले होते.

भोसलेंनी २०१७ची महापालिका निवडणूक ही भाजपच्या तिकिटावर लढली. त्यांची राज्यस्तरावरील राष्ट्रीय श्रमिक आघाडी ही भाजप प्रणित आहे. म्हणूनच आज झालेल्या पत्रकार परिषदेत लावलेल्या फ्लेक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह राज्यातील प्रमुख नेत्यांचे फोटो ही होते.

या फ्लेक्ससमोर बसूनच भोसलेंनी हा प्रताप केला आहे. यावरूनच आता भाजपच्या वाचाळवीर नेत्यांमध्ये भोसलेंचा ही समावेश झाला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.