Mon. Jan 24th, 2022

#Coronavirus चाही राजकीय वापर! बंगालमध्ये भाजपतर्फे वाटलेल्या मास्कवर ‘असा’ संदेश

जगभरात सध्या कोरोना व्हायरसची (Corona Virus) दहशत आहे. चीनमधून हा व्हायरस जगभरात पसरत आहे. भारतात देखील कोरोना व्हायरसचे 29 रूग्ण आढळून आल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी कोरोना व्हायरसच्या धसक्यामुळे होळीदरम्यान रंग खेळणार नाहीत. कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून सरकारी पातळीवरूनही मदत पुरवली जात आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये यावरूनही राजकारण सुरू झालं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची संधी साधण्याचा प्रयत्न स्थानिक भाजप नेत्यांनी केला. याबद्दल त्यांच्यावर आता टीका होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्क्स वाटण्यात आले. मात्र या मास्कवर लिहिलेल्या संदेशामुळे स्थानिक भाजप नेत्यावर टिकेची झोड उठली आहे. जनहितार्थ वाटण्यात येणाऱ्या या मास्क्सवर ‘कोरोना व्हायरस के इन्फेक्शनसे बचाईए मोदी जी’ असा संदेश लिहिला आहे. पंतप्रदान मोदी जनतेला कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनपासून वाचवणार असल्याचा दावा यातून केला जातोय. या मास्कवरील सूचनेमुळे आता विरोधक संतापले आहेत. कोरोना व्हायरससारखं संकट जगावर आलं असताना मदतीच्या आडून मोदींचा प्रचार करण्याचा हा डाव असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

याउलट कोरोनाची लागण जनतेला होऊ नये, यासाठी त्यांना मास्क्स वाटत असल्याचा दावा भाजप नेता प्रताप बॅनर्जी यांनी केलाय.

ममता बॅनर्जींचं हास्यास्पद वक्तव्य

पश्चिम बंगालच्या मुऱख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना यापूर्वी असं वक्तव्य केलं होतं, की दिल्लीतील दंगलींवरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी कोरोना व्हायरसची भीती दाखवली जात आहे. ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपतर्फे वाटण्यात आलेल्या मास्क्सवरील संदेशांमुळे कोरोनाचाही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *