Sat. Jul 31st, 2021

वसईत भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीकडून वाॅचमनला बेदम मारहाण

वसईच्या नायगाव परिसरात भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने किरकोळ कारणावरून सोसायटीतील वाॅचमनला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
याप्रकरणी वाळीव पोलीस स्थानकात  भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं ?

भाजपाचे वसई पूर्व तालुक्याचे अध्यक्ष किशोर भुसा यांची पत्नी प्रियदर्शनी किशोर भुसा हे नायगाव पूर्व रश्मी स्टार सिटी येथील रहिवाशी आहेत.
किशोर भुसा यांची पत्नी यांनी किरकोळ कारणावरून सोसायटीतील वाॅचमेनला चप्पलने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
ही घटना नायगाव पूर्व रश्मी स्टार सिटी या इमारतीत 4 जून रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली.

मारहाणीचा सर्वप्रकार सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

मारहाण केलेल्या वाॅचमनचं नाव  सतेंद्र पांडे आहे.
या प्रकारामुळे सोसायटीतील राहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मारहाण केल्याप्रकरणी वाॅचमनने प्रियदर्शनी किशोर भुसा यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *