ओबीसी आरक्षणासाठी मंत्रायलासमोर भाजपाचा मोर्चा

केल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षण हा चर्चेला विषय ठराल जात आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यापासून महाराष्ट्रात अनेक घडामोडींना वेग आला आहे. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने न्यायालयात भक्कम बाजू मांडून ओबीसींचे आरक्षण टिकवावे, या मागणीसाठी भाजपाच्या ओबीसी सेलकडून मंत्रालयावर मोर्चा काढला जात आहे.
भाजपा मुंबई कार्यालय ते मंत्रालय असा धडक मोर्चा काढून त्यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. मुंबई मध्ये आयोजित आजच्या भाजपाच्या मोर्च्याचं नेतृत्त्व योगेश टिळेकर करत आहे. या मोर्च्यामध्ये भाजपा नेत्यांनीही सहभाग घेत राज्य सरकारची झोप उडवण्याच प्रयत्न करत आहे. मध्य प्रदेशात पुन्हा ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू शकतं मग महाराष्ट्राला का नाही ? महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारची मदत घेऊन ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा असं म्हटलं आहे.
दरम्यान न्यायालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश आहेत आणि जर राज्य सरकार वेळेत ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा मिळवू शकले नाही तर या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवायच घेण्याची वेळ येणार आहे. परंतू राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यापुर्वी ओबीसी आरक्षण लागू झालेलं असेल असा विश्वास कालच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.