फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची बैठक

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघडी सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत भाजपाची बैठक पार पडली.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाची बैठक पार पडली. भाजपाच्या या बैठकीस प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. गिरीश महाजन, प्रवीण दरेकर या बैठकीस उपस्थित होते. त्यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे तसेच रवी राणा सागर बंगल्यावर उपस्थित होते. तर, अपक्ष आमदार गिता जैन यांनीही बैठकीस हजेरी लावली.
दरम्यान, विधान परिषदन निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर देवेंद्र फडणवीसांनी सत्तापरिवर्तनाचे संकेत दिले होते. राज्यसभेत १२३ मतं आणि आता विधान परिषद निवडणुकीत १३४ मतं घेतली असून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे ही परिवर्तनाची नांदी असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच असंतोष मतांमध्ये परावर्ति झाला असल्याचेही फडणवीस म्हणाले होते.
मविआ सरकार धोक्यात येण्याची शक्यता?
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारला आहे. तर दुसरीकडे भाजपची संख्याबळ ११३ आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा असून बहुमताचा आकडा १४५ आहे. शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपाला पाठिंबा दिल्यास भाजपाला बहुमत मिळेल. आणि महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे.