Mon. Aug 8th, 2022

‘चाणक्यनीती’ खेळले, गोव्यात पुन्हा आमदार फुटले !

आमदार फुटीला प्रतिबंध बसावा म्हणून पक्षांतर विरोधी कायदा देशभरात लागू आहे. या कायद्याला गोव्याला सर्वाधिक वेळा पायदळी तुडवले गेलंय. दोन तृतीयांश संख्येचा आधार घेत गोव्यात वेळोवेळी पक्षांतरं घडली आहेत. गोव्यात मध्यरात्रीनंतर विधानसभेत तीन आमदार असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आमदार फुटले. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आमदार फाटाफुटीत गोव्याने आपण आघाडीवर असल्याचं सिद्ध केले आहे

 

 शहांची चाणक्यनीती!

देशभरात पक्षांतर विरोधी कायद्याची विटंबना सगळ्यात जास्त कुठे झाली असेल तर ती गोव्यात.

फुटीरतेच्या श्राप लाभलेल्या आपलं हित साधण्यासाठी नेहमीच वापर करून घेतलाय.

लोकप्रतिनिधींनी आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी दुसऱ्या पक्षात जाऊ नये, आणि जर दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर त्यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवणं अनिवार्य ठरतं.

मात्र पक्षाच्या दोन तृतीयांश इतक्या संख्येने आमदार फुटले आणि दुसऱ्या पक्षात जाऊन मिळाले तर हे पक्षांतर कायदेशीर ठरतं.

याचाच फायदा तीन आमदार असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तों आमदार मनोहर उर्फ बाबू आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी घेतला.

मध्यरात्रीनंतर सभापतींना आपण दोघेही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून फुटून नवीन पक्ष स्थापन करत असल्याचं पत्र सादर केलं.

सध्या बुवा विधानसभेतील सभापतींनी राजीनामा दिला आहे.

उपसभापती मायकल लोबो यांनी या दोन्ही फुटीर आमदारांच्या पत्र स्वीकारलं आणि विधानसभेत मुगाच्या फुटीर गटाला मान्यता दिली.

त्यानंतर लगेचच या दोन्ही आमदारांनी आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन केला.

ही घटना मध्यरात्री घडली असली, तरीही त्याचं बीज 17 तारखेच्या मध्यरात्री रोवलं गेलं होतं.

BJPचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सत्तास्थापनेचा खेळ सुरू असताना अमित शहा यांनी आपल्या चाणक्यनीतीचा वापर करत केला.

गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं.

प्रमोद सावंत यांच्या सरकारात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोघांना मंत्रीपद निश्चित झालं होतं.

त्यामुळे मग महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा तिसरा आमदार हा असंतुष्ट राहणार होता.

नेमका याचाच फायदा उचलत अमित शहा यांनी दीपक पावसकर यांना मंत्री पदाचा लालुच दाखवत आपल्याकडे ओढण्यात यश मिळवलं.

दरम्यान गोव्यात तीन जागांवर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

यातील शिरोडा मतदार संघातून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी निवडणुकीत उतरण्याचा ठरवले आहे.

त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या प्रचारकार्यालाही प्रारंभ केला.

आचारसंहिता लागू होण्याच्या दिवशी प्रचंड रॅलीचं आयोजन या मतदारसंघात करण्यात आलं होतं.

या रॅलीला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी उपस्थिती लावली होती.

शिरोडा मतदारसंघात BJPने विद्यमान आमदार सुभाष शिरोडकर यांना राजीनामा देण्यास लावून भाजपाचं तिकिट देण्याचं नक्की केलं होतं.

मात्र महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला शिरूर मतदारसंघातून मिळत असलेल्या वाढत्या पाठिंब्याने BJPमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं.

याकरताच येथून उमेदवारी मागे घ्या असा दबाव BJPने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षावर आणत होता.

या दबावाला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते दबत नसल्याने दोन आमदारच BJP ने पळवले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.