Thu. Jan 20th, 2022

भाजपाचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यांनी दिला राजीनामा

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तर आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपात भूकंप आला आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भाजपचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यांनी राजीनामा दिला आहे. तसेच स्वामी प्रसाद मौर्या यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. तसेच आमदार बृजेश प्रजापती, भगवती सागर आणि रोशन लाल वर्मा यांनीसुद्धा राजीनामा दिला आहे.

स्वामी प्रसाद मौर्या यांनी भाजपला राजीनामा दिल्यानंतर अखिलेश यादव यांची भेट समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विट करत स्वामी प्रसाद मौर्या यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगितले आहे.

अखिलेश यादव यांनी ट्विट करत सामाजिक न्याय आणि समता-समानताची लढाई करणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्या तसेच त्यांच्यासोबत आलेल्या सर्व नेत्यांचे समाजवादी पक्षामध्ये स्वागत केले आहे. तसेच सामाजिक न्यायाची क्रांती होईल – २०२२मध्ये परिवर्तन होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *