Wed. Oct 27th, 2021

मंत्रिपदावरुन भाजपच्याच दोन आमदारांमध्ये फ्लेक्सयुद्ध

 

जय महाराष्ट्र न्यूज,पुणे 

 

पिंपरीचिंचवडमध्ये भाजपच्याच दोन आमदारांमध्ये फ्लेक्सयुद्ध रंगलं आहे.

 

चक्क संभाव्य मंत्रिपदावरुन आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यामध्ये हे फ्लेक्सयुद्ध रंगले.

 

त्याचं झालं असं की, पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता भाजपकडे खेचून आणण्यात आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे या जोडीनं जबरदस्त राजकीय ‘फिल्डिंग’ लावली.

 

एक दिलानं केलेल्या प्रयत्नांमुळं निवडणुकीत यशही मिळालं. त्यावेळी जो जास्त नगरसेवक निवडून आणेल त्याला मंत्रीपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं.

 

त्यातच मे महिन्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा आहे.. याचपार्श्वभूमीवर दोन आमदारांमध्ये चांगलंच फ्लेक्सयुद्ध रंगलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *