Mon. Jan 24th, 2022

‘पप्पू’ नव्हे ते तर ‘गाढवांचे सम्राट’; ‘या’ भाजपा आमदाराची राहुल गांधींवर टीका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त टीका सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना राफेल घोटाळ्यावरून घेरणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधींवर टीका करताना भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांच्या आमदार मुलाची जीभ घसरली आहे.

राहूल गांधी आता पप्पू राहिले नसून ते गाढवांचे सम्राट झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये राफेल डीलची कागदपत्रे चोरीला गेल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करण्याची आणि चौकशी करण्याची मागणी केली.

तसेच एअर स्ट्राईकवरूनही त्यांना लक्ष्य केलं.

यावरून भाजपाचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे पूत्र आकाश विजयवर्गीय यांच्या मुलाने राहुल गांधींवर टीका केली आहे.

आकाश हे मध्य प्रदेशमधील इंदौर मतदारसंघाचे आमदार आहेत.

काय म्हणाले आकाश विजयवर्गीय ?

यापूर्वी राहुल गांधी यांना पप्पू म्हणून ओळखले जात होते.

हे नाव हानीकारक नव्हते आणि गोंडस होते. पण आता राहुल देश विरोधी असल्यासारखे वागत आहेत.

त्यामुळे आम्ही त्यांचे नाव बदलत असून पप्पूवरून त्यांना आजपासून ‘गधों का सरताज’ म्हणून ओळखलं जाईल, अशी जोरदार टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *