Jaimaharashtra news

…तर राऊतांची जीभ जागेवर राहणार नाही- नारायण राणे

शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. राज्याचे नाही देशाचे दैवत आहेत. आमच्या दैवताबद्दल, वंशजाबद्दल काही बोललात तर जीभ जागेवर राहणार नाही, असा इशारा नारायण राणेंनी संजय राऊतांना दिला.

कायदा, सुव्यवस्था, सरकार तुमचं आहे, काय करायचं ते करुन घ्या, असंही राणे म्हणाले.

नारायण राणेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला.

काय म्हणाले राणे ?  

संजय राऊतांना सत्तेचा माज चढलाय. त्यांची जीभ फार चालतेय. सत्तेमध्ये त्यांच्या भावाला मंत्रीपद मिळालं नाही. यानंतर संजय राऊतांचे अनेक वक्तव्य आले. यावरुन त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्या सारखं वाटतंय.

संजय राऊतांनी बुधवारी पुण्यात एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी उद्यन राजेंकडे शिवाजी महाराजांचे वशंज असल्याचे पुरावे मागितले होते.

यासर्व प्रकरणावरुन नारायण राणेंनी संजय राऊतांचा समाचार घेतला.

Exit mobile version