Thu. Sep 23rd, 2021

मुंबईत उद्यानाला टीपू सुलतानाचे नाव देण्यावरून वाद;शिवसेनेचा मात्र छुपा पाठिंबा

मुंबई: मुंबईतील गोवंडी येथील उद्यानास टिपू सुलतान उद्यान नाव देण्यास भाजपने विरोध दर्शविला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव रद्द करण्याची भाजपची मागणी धुडकावत शिवसेना अध्यक्षांनी प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारार्थ परत पाठवित भाजपच्या प्रस्ताव नामंजूर करण्याच्या मागणीला बगल दिली. यामुळेच या उद्यानास ‘टिपु सुलतान उद्यान’ असे नाव देण्यास शिवसेनेचा छुपा पाठिंबा आहे का असा सवाल देखील भाजपकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

भाजप नगरसेवकांनी समिती अध्यक्षांना घेरावदेखील घातला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनात भाजप नगरसेवकांनी विरोध प्रकट केला आहे.यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरुन भाष्य करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ‘टिपू जयंती साजरी करणाऱ्या शिवसेनेने आता गोवंडीत उद्यानाला टिपूचे नाव देण्याच्या प्रस्तावाला छुपा पाठिंबा दिलाय. हिंदुत्वाचा टिळा लावायचा हिंदूंच्या कत्तली करणाऱ्यांना खांद्यावर घेऊन नाचायचे, असे उफराटे राजकारण शिवसेनेने सुरू केले आहे,’ अशी टिप्पणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *