शिवप्रेमींच्या संतापानंतर ‘ते’ वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे भाजपचे आदेश

शिवप्रेमींच्या संतापापुढे भाजपने गुडघे टेकले आहेत. नेटकऱ्यांच्या तीव्र संतांपानतर भाजपने वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.
या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी देखील या विरोधात ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली होती.
रविवारी दिल्लीत भाजपच्या कार्यालयात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. हे पुस्तक भाजपच्या जय भगवान गोयल यांनी लिहिले आहे.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजूंनी हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे आदेश दिलेत.
या पुस्तकावरुन भाजपवर निशाणा साधण्यात आला होता.
दरम्यान या पुस्तकावरुन संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांचे वंशजांना हे मान्य आहे का, असा सवाल केला होता. यावरुन संभाजी राजेंनी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती.
संजय राऊतांच्या जीभेवर लगाम घालण्याचा सल्ला संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंना दिला होता.