‘गाढवांचे वजन बैलांना नकोसे’; भाजपाचा भाई जगताप यांना चिमटा

मुंबई: काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईमधील अँटोप हिल येथील भरणी नाका परिसरात महागाई विरोधात आंदोलनावेळी बैल गाडीवर मुबंई अध्यक्ष भाई जगताप आणि कार्यकर्ते उभे राहून घोषणा देते होते. यावेळी बैल गाडी कोसळली आणि या बैलगाडीवर उभे असलेले भाई जगताप आणि कार्यकर्तेही खाली कोसळले. यामध्ये काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले.
यावेळी अतिरिक्त वजनामुळे नेत्यांसह बैलगाडी कोसळल्यामुळे बैलांनादेखील इजा झाली आहे. या आंदोलनात बैलगाडी कोसळताना बैलांना जखमी करून गेलीय. यामुळे त्यांचा मालक चिंतेत सापडलाय.
मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात आंदोलनाचा काँग्रेसचा स्टंट चांगलाच अंगाशी आलाय. हमारा नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो अशी घोषणा देताच बैलगाडी मोडली. बैलगाडीवर चढलेल्या नेत्यांची गर्दी आणि त्यात सिलेंडरचे ओझे अखेर बैलगाडीला सहन झाले नाही, काँग्रेसचे नेते जमिनीवर कोसळले
गाढवांचे वजन बैलांना नकोसे’
भाजपाचा भाई जगताप यांना चिमटा
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी ट्विट करून बोचरी टीका केली आहे.
‘गाढवांचा भार उचलायला बैलांचा नकार! मा. भाई जगताप, तुम्हाला सांगू इच्छितो की माणसाने झेपेल तेवढंच करावं. असे पब्लिसिटी स्टंट करताना त्या मुक्या जिवांचा विचार करावा!, असं ट्वीट प्रसाद लाड यांनी केलं आहे.