Jaimaharashtra news

‘मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ दर्शनाचा कार्यक्रम’

राज्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणात पाहणी दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या या अवघ्या काही तासांच्या पाहणी दौऱ्यावरून अनेक जणांकडून टीका आहे.

मुख्यमंत्र्यांचा नुकसानीची पाहणी कऱण्यासाठीचा दौरा केवळ दर्शनाचा कार्यक्रम असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्यासंदर्भात दरेकर यांनी हे ट्विटच्या माध्यमातून ही टीका केली आहे.

‘विरोधी पक्षनेते तीन दिवस, तर मुख्यमंत्री तीन तास. विरोधी पक्षनेते कोकणवासीयांच्या बांधावर जाऊन विचारपूस, मुख्यमंत्र्यांचा केवळ दर्शनाचा कार्यक्रम’, असं ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

Exit mobile version