Sun. Apr 21st, 2019

अमित शाहांच्या प्रकृतीत सुधारणा, ‘एम्स’रुग्णालयातून डिस्चार्ज

0Shares

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे त्यांना बुधवारी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

आत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना रविवारी सकाळी 10 वाजून 22 मिनिटांनी डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती एम्सकडून देण्यात आली आहे.

याशिवाय, अमित शाह यांनी स्वतःदेखील याबाबत माहिती दिली, आणि माझी प्रकृती ठिक व्हावी यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो असे ट्विट त्यांनी केले आहे.  भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही ट्विटरद्वारे शाह यांचा स्वाइन फ्लू बरा झाला असून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली आहे.

अमित शाह यांना बुधवारी सकाळपासूनच बरे वाटत नव्हते. छातीमध्ये दुखत होते तसेच अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे रात्री साडेआठच्या सुमारास ते तपासणीसाठी एम्स रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी चाचणीमध्ये त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. त्यानंतर शाह यांनी स्वत: टि्वट करुन स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती दिली होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *