Mon. May 10th, 2021

सुधीर मुनगंटीवारांचा ताफा अडवल्यानंतर संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा रास्तारोको

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

 

अमरावतीत अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवारांचा ताफा अडवल्यानंतर भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. गुरुकुंज मोजरीत भाजपनं रास्ता रोको केला.

 

युवक काँग्रेस आणि शेतकऱ्यांनी मुनगंटीवारांच्या ताफ्यावर कांदेफेक आणि काळे झेंडे दाखवले. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि या आंदोलनाला उत्तर

देण्यासाठी रास्ता रोको केला.

 

या आंदोलनदरम्यान पोलीस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *