Wed. Aug 4th, 2021

‘बादशाह अकबर वेषांतर करून महिलांशी दुष्कृत्य करायला मीनाबाजारात जायचा!’

बादशाह अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यातील महानतेबद्दलचा वाद शमल्यासारखं वाटत असतानाच महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा बादशाह अकबरावर निशाणा साधण्यात आला आहे. जयपूर येथे भाजप मुख्यालयात महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात राजस्थानचे भाजप प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी अकबर बादशाहचं चारित्र्यहनन केलं.

काय म्हणाले सैनी?

अकबर बादशाह व्यभिचारी होता.

तो मीनाबाजारात जात असे.

मीनाबाजारात पुरूषांना परवानगी नसल्यामुळे तो वेषांतर करून जात असे.

तेथे जाऊन तो महिलांशी दुष्कृत्य करत असे.

अकबर बिकानेरची राणी किरण देवी हिच्यावर अत्याचार करणार होता.

मात्र तिला आधीच या गोष्टीची कल्पना आल्यामुळे तिने त्याला जमिनीवर पाडलं आणि छातीवर खंजीर धरला.

घाबरलेल्या अकबराने प्राणांची भीक मागत ‘हिंदुस्तानचा बादशाह तुझ्या पायाखाली आहे’, असं म्हणत स्वतःची सुटका केली.

त्या दिवसानंतर मीनाबाजार बंद झाला.

असं सैनी यांनी म्हटलं आहे. हे इतिहासात नमूद असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसकडून सैनी यांच्या वक्तव्याची निंदा

अकबर बादशाहच्या चारित्र्यासंदर्भात राजस्थान प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची काँग्रेसने निंदा केली आहे.
काँग्रेस प्रवक्त्या अर्चना शर्मा यांनी सैनी यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय.

तसंच अशी वक्तव्यं करून समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *