Sat. May 15th, 2021

Corona | एकनाथ खडसेंकडून निर्जंतुकीकरणासाठी ट्रॅक्टरवरुन फवारणी

राज्यात कोरोनाने हाहाकार माजावला आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक ठिकाणी निर्जंतुकीकरण केलं जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी जाऊन औषध फवारणी करणं शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. स्वखर्चातून आपल्या विभागात औषध फवारणी करत आहेत.

जळगावात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी निर्जंतुकरणासाठी ट्रॅक्टरद्वारे फवारणी केली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता आपलं गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुढे सरसावले आहे त्यांनी चक्क ट्रॅक्टर चालवत मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात शाळा आणि परिसर या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याचं काम हाती घेतले आहे

राजकारणामध्ये भल्याभल्यांना हलवून सोडणारे खडसे सध्या आपल्या गावी आहेत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण करत ते अधिकाधिक वेळ देऊ लागले आहेत खडसे यांना ट्रॅक्टर चालवताना पाहून आणि स्वतः धुरळणी करताना पाहून अनेकांनी तोंडात बोट घातले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *