Wed. Aug 10th, 2022

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा विराजमान

मध्य प्रदेशमधील राजकीय नाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सोमवारी शपथग्रहण केली. राज्यपाल लालजी टंडन यांनी शिवराज सिंह चौहान यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेश राज्याचे १९वे मुख्यमंत्री ठरले आहेत. शिवराज सिंह चौहान यांची मुख्यमंत्री म्हणून ही चौथी वेळ आहे.

त्यामुळे आता शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचा कारभार पाहणार आहेत. शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारीच शपथग्रहण केल्यानंतर पदाचा पदभारदेखील स्विकारला.

तसेच चौहान यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदीदेखील निवड करण्यात आली.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासोबतच सिंधिया समर्थक असलेल्या २२ आमदारांनी देखील राजीनामा दिला होता. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं होत.

तसेच दुसऱ्या ठिकाणी भाजप बहुमताच्या आकडाच्या जवळ होती. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये सरकार बनणार असल्याचं म्हटलं जात होतं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.