Sat. May 25th, 2019

“BJP-शिवसेनेचं भांडण चौकातील कुत्र्यांच्या भांडणासारखं”

0Shares

“शिवसेना भाजपसमोर लाचार झाली आहे. BJP-शिवसेनेचं भांडण म्हणजे चौकातील कुत्र्यांच्या भांडणासारखं आहे”, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेतील फलटण येथील सभेत ते बोलत होते.

“एकीकडे मुख्यमंत्री म्हणत आहेत आम्ही लाथ मारली तर दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणताहेत आम्ही लाथ मारली. एकमेकांना लाथ मारायचा प्रकार एवढा झालाय की उध्दव ठाकरे साहेबांचा एक पाय लांब झालाय की काय असं मला वाटायला लागलंय”, असा टोमणाही मुंडे यांनी लगावला.

मंत्री महादेव जानकरांचा समाचार

जानकरांना सर्व गोष्टींची जाण आहे असा समज आहे,

ते म्हणतात की आम्ही ऑनलाईन चारा देऊ.

ऑनलाईन चारा कसा पोहोचेल?

त्याचीही अवस्था कर्जमाफीसारखी होईल.

ऑनलाईनचा खेळ लावला आहे,

अशी टीका धनंजय मुंडे फलटण निर्धार मेळाव्यात केलीय..

अजित पवार यांचा भाजपवर निशाणा

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजप सरकारला धारेवर धरलं.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नसलेलं सरकार असल्याने गेल्या साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या झाल्या आहेत.

अशावेळी 302चा गुन्हा कुणावर दाखल करायचा हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं,

असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलाय.

गाजरालाही लाज वाटू लागली आहे!

सरकारकडून नुसती गाजरं दाखवण्यात येत आहेत.

आता त्या गाजरालाही लाज वाटायला लागली आहे, परंतु यांना लाज वाटत नाही.

आपण आज 21 व्या शतकात आहोत, आणि भाजप सरकार हनुमानाची जात काढून आपली राजकीय पोळी भाजून घेतंय, असा आरोप पवार यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *