Sat. Oct 1st, 2022

सीएसएमटी दुर्घटनेसाठी पादचारी जबाबदार,भाजपा नेत्याचं अजब वक्तव्य

‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले.नरिमन पॉइंट,चर्चगेट आणि आसपासच्या परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार मंडळी पूर्व उपनगरांत आपल्या घरी जाण्यासाठी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात येत असतात.

त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. पूल खाली पडताच पुलावरून जाणारे काही पादचारीही त्यासोबत कोसळले. हा भाग काही मोटारगाडय़ांवर कोसळून त्यांचेही नुकसान झाले. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

या दुर्घटनेमुळे मुंबईसहित अख्खा महाराष्ट्र शोक व्यक्त करत आहे.नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसहित अनेक दिग्गज  नेत्यांनी या दुर्घटनेसाठी शोक व्यक्त केला. परंतु भाजपाच्या एका नेत्याने या दुर्घटनेसाठी पादचारी जबाबदार असल्याचं अजब विधान केलं आहे.

‘या’ त्या भाजपानेत्या ज्यांनी हे अजब वक्तव्य केलं…

भाजपा प्रवक्त्या संजू वर्मा यांनी सीएसएमटी पूल दुर्घटनेसाठी थेट पादचाऱ्यांनाच जबाबदार ठरवलं आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं असून संजू वर्मा यांनी ही दुर्घटना नैसर्गिक असल्याचं सांगितलं.

सरकारचं या दुर्घटनेशी काही घेणं देणं नसल्याचं सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केल. आणि पादचारीच दुर्घटनेला जबाबदार असल्याचं म्हटलं.

संजू वर्मा यांच्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून सोशल मीडियावर टीका होत आहे.

अनेक भाजप नेते त्यांच्या अशा अजब वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत.संजू वर्मा यांनी ही असंवेदनशील वक्तव्य केलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.