आता ‘या’ शहरात मिळणार भाजपची ‘दीनदयाल थाळी’

राज्यात सत्तेत आल्यानंतर शिवसेनेने शिवभोजन थाळी सुरु केली आहे. या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या १० रुपयांमध्ये जेवण मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर या योजनेचा अनेक लोकांनी लाभ घेतला.
दरम्यान शिवसेनेने सुरु केलेल्या या शिवभोजनानंतर भाजपने नवी थाळी सुरु केली आहे. त्यामुळे आता जनतेची जेवणाची सोय होणार आहे.
भाजपकडून पंढरपुरात ही जेवणाची योजना सुरु केली आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ही थाळी सुरु केली आहे. या थाळीला दीनदयाल थाळी असे नाव देण्यात आले आहे.
पंढरपुरच्या भाजपच्या अध्यक्षांनी ही थाळी सुरु केली आहे. राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
शिवभोजन थाळीच्या तुलनेत या थाळीची किमंत २० रुपयांनी जास्त आहे. या दीनदयाल थाळीसाठी ३० रुपये मोजावे लागणार आहेत.
म्हणून पंढरपुरात सुरु केली थाळी
दीनदयाल थाळी पंढरपुरातच का सुरु केली, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. परंतु पंढरपुरात थाळी सुरु करण्यामागे एक कारण आहे.
विठ्ठल रखुमाई महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. पंढरपुरात असलेल्या या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी राज्यासह देशाभरातून भाविक येत असतात.
दररोज दर्शनासाठी २५ ते ३० हजार भाविक हे पंढरपुरात येतात. या भाविकांना स्वादिष्ट जेवण मिळावं, या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
दुपारी १२ ते १ या वेळेतच या थाळीचा लाभ घेता येणार आहे.
…अशी असेल थाळी
३ चपात्या
१ वाटी मुद भात
१ वाटी भाजी
१ वाटी आमटी
ताक
लिंबू फोड
शेंग चटणी
लोणचा-पापड