इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य : ‘त्या’ वक्तव्याबद्दल काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

इंदोरीकर महाराजांच्या त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. त्यांनी महिलांविषयी ते वक्तव्य करायलं नको होतं. पण इंदोरीकर महाराजांची दररोज ८० किर्तन होतात. ती सर्व किर्तन जनप्रबोधनाची असतात. आपल्या किर्तनातून इंदोरीकर महाराज स्वच्छता, शिक्षण या सर्व विषयांच महत्तव आपल्या किर्तनातून मांडतात.
एका वाक्याने माणसाचं सर्व गेलं ? त्यामुळे पुन्हा एकदा इंदोरीकर महाराजांनी तसं वक्तव्य करायला नको होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला माधव भंडारी, माजी खासदार किरीट सोमय्या उपस्थित होते.
मी इंदोरीकरांच्या प्रवचनाला गेलो आहे. त्यांच्या प्रवचनाचं काही कार्यकर्ते आयोजन करतात. मी एकदा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तोर इंदोरीकरांच्या किर्तनाला गेलो होतो.
एका किर्तनाला ५ मिनिटं बसण्याच्या तयारीने गेलो होतो, पण तासभर बसलो. इंदोरीकर समाजातल्या चुकींवर मार्मिकपणे बोट ठेवतात. त्यांच्या एका चुकीमुळे सर्व गेलं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
…तर किर्तन सोडून शेती करेन – इंदुरीकर महाराज
एका क्षणात माणसाची राख करुन टाकते. त्याची सर्व तपश्चर्या वाया होते. मग पुढील दोन-तीन दिवस काही विषयच नसतो. त्यामुळे असं करु नका, अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना केली.
आम्ही 100% इंदुरीकर महाराजांच्या पाठीशी – सुरेश धस
दरम्यान काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराजांनी एका किर्तनादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी पुत्रप्राप्तीसाठीचा सम विषम फॉर्म्युला सांगितला होता.
इंदुरीकर महाराजांकडून आता शिक्षकांची खिल्ली, शिक्षक संघटना नाराज
इंदोरीकरांच्या या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तर सोशल मीडियावर इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या जात आहे.