Mon. Sep 27th, 2021

औरंगाबादमध्ये भाजप उभारणार तिसरे कोव्हिड सेंटर

औरंगाबाद: राज्यात कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्णांना आरोग्य सुविधांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. अशावेळी कोरोनारुग्णांना खाटांसाठी प्रतीक्षा करावी लागू नये याकरिता औरंगाबादमध्ये भाजपकडून तिसरे कोव्हिड सेंटर उभारले जात आहे.

भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड औरंगाबादमध्ये लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर उभारणार आहेत. त्यामध्ये लहान मुले आणि त्यांच्या आईची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात आमदार प्रशांत बंब आणि आमदार अतुल सावे यांनीही कोव्हिड सेंटर उभारले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भगवात कराड यांनी लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *