Wed. May 18th, 2022

‘गोव्यात भाजपला बहुमत मिळेल’ – देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजपच्या गोव्यातील निवडणूक प्रभारी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘गोव्यात भाजपचे ३४ जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले असून पणजी मतदार संघातून भाजपच्या विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपा पर्रिकरांचे स्वप्नपूर्ती करत असून गोव्यात भाजपालाच पूर्ण बहुमत मिळेल’, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त  केला आहे.

भाजपाने गोव्याचा चेहरामोहरा बदलला असून काँग्रेसला गोवा लुटायचा आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेसचे सरकार असताना गोव्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच तृणमूल काँग्रेसला गोव्याच्या जनतेने आधीच नाकारले असून तृणमूलने गोव्यात भ्रष्टाचाराचे बीजरोपण केले आहे. गोवेकरांनी तृणमूलच्या हिंदूविरोधी राजकारणाला नाकारले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मगोपने तृणमूलसोबत युती करत आत्मघात केला असून रेटून खोटे बोलणे, हे आम आदमी पक्षाचे काम असल्याचे, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

गोवा विधानसभेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. गोव्यात भाजपचे ३४ जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तसेच आम्हाला पर्रिकर परिवाराविषयी आदर आहे. उत्पल पर्रिकर आणि त्यांच्या परिवारातील कोणताही सदस्य असो, सर्व आमच्या परिवाराचा भाग आहेत. पर्रिकर परिवार हा भाजप परिवाराप्रमाणे आहेत. ते सर्वजण आमच्या जवळचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

1 thought on “‘गोव्यात भाजपला बहुमत मिळेल’ – देवेंद्र फडणवीस

  1. Hey man, was just looking through the net looking for some info and came across your post. I am impressed by the info that you have on this blogsite. It shows how well you understand this topic. bookmarked this page, will come back for more. You, my friend, ROCK!!!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.