Mon. May 17th, 2021

Exit Poll नंतर सट्टाबाजाराचा कौल कुणाला?

लोकसभा निवडणुकांसाठीचा एक्झिट पोल नुकताच जाहीर झाला आहे. केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर सट्टा बाजारानंही असाचं अंदाज व्यक्त केला आहे. भाजपाचीच सत्ता केंद्रात येणार असून 2014 तुलनेत भाजपाला कमी जागा मिळणार असं सट्टा बाजारानेहूी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या विजयाने सट्टेबाराजाचे मोठे नुकसान झाले होते. हे स्वतः नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत सांगितले आहे. 2019 च्या एक्झिट पोलनंतर देखील सट्टेबाजाराला मोठा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सट्टाबाजाराचा कौल भाजपलाच

पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार येण्याचा अंदाज

2014च्या तुलनेत भाजपला कमी जागा मिळण्याचा अंदाज

भाजपला 238 ते 245 जागा मिळण्याचा सट्टेबाजांचा अंदाज

भाजपला 242 ते 245 जागांचा राजस्थानमधील सट्टेबाजांचा अंदाज

भाजपला 238 ते 241 जागांचा दिल्लीतल सट्टेबाजांचा अंदाज

एनडीएला 300 पेक्षा अधिक जागा मिळण्याचा अंदाज

यूपीएला 150 जागा मिळण्याचा सट्टेबाजांचा अंदाज

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *