Mon. Jul 4th, 2022

Delhi Election Result : आपने सत्ता राखली पण संख्याबळ घटलं

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. दिल्लीत पुन्हा आपला सत्ता राखण्यास यश आले आहे. या विजयासह आपचा हॅट्रिक विजय झाला आहे. आपने सत्ता राखली असली तरी, आपचं संख्याबळ २०१५ च्या तुलनेत घटलं आहे.

आपचा एकूण ६२ जागांवर विजय झाला आहे. तर भाजपचे एकूण ८ उमेदवार विजयी झाले आहेत.

दिल्लीतील २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आपचे एकूण ६७ उमेदवारांचा विजय झाला होता. तर भाजपला केवळ ३ जागांवर जनमत मिळालं होतं.

दरम्यान २०१५ च्या तुलनेत यंदा भाजपचे संख्याबळ वाढले आहे. भाजपचा ८ जागांवर विजय झाला आहे.

दिल्लीतील एकूण ७० जागांसाठी एकूण ६५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दिल्लीत ८ फेब्रुवारीला मतदान पार पडले. यंदा एकूण ६२.५९ टक्के मतदान झालं.

२०२० पक्षनिहाय विजयी उमेदवार

आम आदमी पार्टी – ६२

भाजप – ०८

काँग्रेस – ००

२०१५ चं पक्षीय बलाबल

आम आदमी पार्टी – ६७

भाजप – ०३

काँग्रेस – ००

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.