Tue. Aug 9th, 2022

राज्यभर भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

सर्वोच्च न्यायालयाच्या बहुमत चाचणी न रोखण्याच्या निर्णयानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. तर आता भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भाजप नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि फटाक्याच्या आतिषबाजी करून हा आनंद साजरा केला. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाची लाट उसळली आहे. या निर्णयानंतर भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. सर्व भाजप नेते एकमेकांना पेढे भरवताना पाहिला मिळाले.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले असून आता भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.बुधवारी भाजपाच्या जळगाव महानगर तर्फे जळगाव शहरातील टॉवर चौक येथे फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भाजप नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि फटाक्याच्या आतिषबाजी करून हा आनंद साजरा केला.

भारतीय जनता पार्टीच्या जळगाव महानगर तर्फे जळगाव शहरातील टॉवर चौक येथे फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला आहे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत जी अनैसर्गिक युती केली होती या युतीचा नाश झालेला आहे. अशी भावना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.