Thu. May 13th, 2021

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा १०० दिवसांचा देशव्यापी दौरा

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा १०० दिवसांचा देशव्यापी दौरा आखण्यात आला आहे.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपाचे आता पासून प्रयत्न सुरु झाले आहे. यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा १०० दिवसांचा देशव्यापी दौरा आखण्यात आला आहे. या कालावधीत, मागील लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यात भाजपाची स्थिती कमकुवत होती त्या प्रदेशात आपले स्थान मजबूत करण्यासाठी पक्षाचा जोर असेल.

भेटीदरम्यान भाजप अध्यक्ष जे पी नड्डा राज्यस्तरीय भाजपा नेत्यांची भेट घेतील आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झालेल्या जागांवर लक्ष केंद्रीय करण्यात येईल. तसेच या दौऱ्याच्या वेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबतही बैठक घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *