Thu. Jan 20th, 2022

उत्तरेत भाजपाचे अयोध्या कार्ड

उत्तर प्रेदश विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून उत्तर प्रदेशात फोडोफोडीचे राजकारण सुरू आहे. गेल्या २४ तासांमध्ये भाजपच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यंदाची आमदारकीची निवडणूक अयोध्येतून लढवण्याची चाचपणी केल्याचे समजते आहे. या निमित्ताने भाजपाने उत्तर प्रदेशाच्या राजकारणात अयोध्या कार्ड वापरायचे दिसत आहे. अयोध्येत राममंदिर बांधण्याचे भाजपाचे आश्वासन पूर्ण होत असताना योगी स्वतः मैदानात उतरणार असल्याचे समजत आहे.

दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारला पुन्हा एकदा झटका बसला आहे. भाजपचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यांच्यानंतर आता भाजपमधील आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे. भाजपचे मंत्री दारा सिंह चौहान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *