Mon. Aug 15th, 2022

सिंधुदुर्ग बॅंकेवर भाजपचे वर्चस्व, ‘मविआ’चे सतीश सावंत पराभूत  

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर राणे पितापुत्राने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार आणि भाजप आमने-सामने आले. दरम्यान, मतमोजणीनुसार महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला असून शिवसेना नेते आणि विद्यमान जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष  सतीश सावंत पराभूत झाले आहेत.

निवडणूकीच्या मतमोजणीमध्ये शिवसेना नेते सतीश सावंत आणि भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकारी पॅनेलचे उमेदवार विठ्ठल देसाई यांच्याच चांगली लढत रंगली. दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यामुळे दोन्ही उमेदवारांमध्ये ईश्वरचिठ्ठिद्वारे निकाल घोषित करण्यात आला. त्यामध्ये सहकारी पॅनेलचे उमेदवार विठ्ठल देसाई यांनी बाजी मारली आहे.

आतापर्यंत भाजप प्रणित सिद्धीविनायक पॅनलचे ११ उमेदवार विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडी समृद्धीपॅनलचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत.

सावंतवाडीमधून शिवसेनेचे विद्याधर परब विजयी झाले आहेत तर वैभववाडी गटातून भाजपचे दिलीप रावराणे यांनी विजयाची पताका फडकवली आहे. मालवणमधून मविआ आघाडीचे उमेदवार व्हिक्टर डांटस विजयी आहेत तर दोडामार्गमधून शिवसेनेचे गणपत देसाई यांचा विजय झाला तर कुडाळमधून काँग्रसचे विद्याप्रसाद बांडेकर विजयी झाले.

कणकवलीमधून सहकारी पॅनेलचे उमेदवार विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपचे अतुल काळसेकर तर सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून मविआचे सुशांत नाईक विजयी झाले आहेत. आणि औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघातून भाजपचे गजानन गावडे विजयी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.