…अखेर खडसेंचा भाजपाला रामराम!
खडसेंनी दिली भाजपाला सोडचिठ्ठी…

जळगाव : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. त्यांनी आज दुपारी आपल्या भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. भाजपातून सोडचिठ्ठी घेतल्यावर खडसे आता राष्ट्रवादीत दाखल होणार आहे. खडसेंच्या प्रवेशाचा सोहळा येत्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता आहे.
आज खडसेंनी जयंत पाटील यांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला रिट्वीट केल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश पक्का मानला गेला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी रिट्वीट मागे घेतले होते.
भाजपा सोडल्यानंतर आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. राष्ट्रवादी प्रवेशाबाबत राष्ट्रवादीकडून अधिकृत घोषणा मुंबईतून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.