Mon. Aug 15th, 2022

बुलडाण्यात भाजपचे कंदील आंदोलन

राज्यात कोळशाच्या टंचाईमुळे भारनियमनाची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणात भारतनियमन होत असल्यामुळे सामान्यांसह शेतकरी, विद्यार्थी त्रस्त होत आहेत. त्यामुळे राज्यातील भारनियमनाविरोधात बुलडाण्यातील खामगाव शहरात कंदील आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

राज्यातील भारनियमनाला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत आमदार आकाश फुंडकर यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे. खामगाव शहरात कंदील आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. जोवर राज्यातील भारनियमन बंद होणार नाही, तोवर रस्त्यांवरील लढाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी या आंदोलनात शेकडो भाजप कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्यादेखील सहभागी झाल्या होत्या.

नागपुरात भाजपाचा कंदील मोर्चा

भारनियमन आणि सिक्युरिटी डिपॉझिट दुप्पट करण्याच्या विरोधात भाजप आक्रमक झाली असून कंदील मार्च काढण्यात आला. अघोषितपणे सुरू असलेल्या भारनियमनाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात रविवारी नागपूरच्या संविधान चौकात कंदील मार्च काढण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.