Mon. Aug 15th, 2022

विधान परिषद निवडणुकीत भाजपाची सरशी; बावनकुळेंकडून काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपेक्षित विजय मिळवताना काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावला आहे. चंद्रकांत बावनकुळे यांना भाजप आणि मित्रपक्षांची मते मिळालीच शिवाय त्यांना महाविकास आघाडीचीही काही मते मिळाली असल्याचे समोर आले आहे.

भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली तर काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक डॉ. रविंद्र भोयर यांना केवळ एक मत मिळाले आहे. महाविकास आघाडीची जवळपास १६ मते फुटल्याचे समोर आले आहे.

नाना पटोलेंवर उमेदवार बदलण्याची नामुष्की

विधान परिषद निवडणुकी तोंडावर असताना प्रदेशाध्यक्ष नाटा पटोले यांच्यावर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली. काँग्रेसने डॉ. रविंद्र भोयर यांना बदलून त्यांच्याऐवजी मंगेश देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र आता भाजपमधून काँग्रेसध्ये आलेले नगरसेवक डॉ. रविंद्र भोयर यांना केवळ एकच मत मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.