Wed. Aug 10th, 2022

गोवा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, गोवा निवडणुकीसाठी भाजपाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गोवा विधानसभा निवडणुकासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी, ‘जाहीरनाम्यात आम्ही जनतेच्या मतांना प्राधान्य दिले आहे’, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

गोवा विधानसभेच्या निवडणुकासाठी २२ संकल्प करण्यात आले आहेत. काय आहे भाजपाचा जाहीरनामा?

ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन आणि तरुणांना रोजगार देऊन ईपीएफ अकाऊंटमध्ये पाच हजार रुपये टाकणार असल्याचे नमूद करण्यात आले आहेत.

महिलांना घर खरेदीसाठी दोन टक्के व्याजाचे कर्ज देण्यात येणार आहे. तर गोव्याला ट्युरिझम हब करण्यात येणार आहे. क्लिन ट्रान्स्पोर्टेशनचाही संकल्प होणार आहे. तसेच गोव्यातील प्रत्येक घराला तीन मोफत एल.पी.जी सिलिंडरची सुविधा देण्यात येणार आहे.

पुढील पाच वर्षांमध्ये सर्व गोमंतकीयांसाठी चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देणार असन पात्र कुटुंबांना महिलांसाठी २ टक्के आणि पुरुषांसाठी ४ टक्के व्याजदरान गृहकर्ज देण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांसाठी पेट्रोल आणि डिझेलवरील राज्यशुल्क वाढवणार नाही तर मनोहर पर्रीकर कल्याण निधीची स्थापना करण्यात येणार आहे.

गोव्यातील स्थानिक रहिवाश्यांना होमस्टे सुविधा सुरू करणार असून खेळ आणि समुद्र किनाऱ्याभोवती पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार आहे. येत्या पाच वर्षात राज्यातील वार्षिक पर्यटकांच्या आगमनाची संख्या दुप्पट करणार आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देत संमेलने आणि प्रदर्शनांचे आशियातील केंद्रे बनवणार आहे.

पुढील पाच वर्षात राज्यातील बहुस्तरीय गरीबीचे पूर्णपण निर्मूलन करणार असून पुढील वीस वर्षांत गोव्यातून भारतासाठी सुवर्णपदक विजेता घडविण्यासाठी मिशन गोल्ड कोस्टची सुरूवात होणार आहे. गोव्यात नवीन आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम आणि फुटबॉल अकादमी स्थापन करणार असून आगामी वर्षामध्ये फिफा-यु-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच गोव्याला विकासात्मकदृष्टीने पुढे नेण्यात येणार आहे.

गोव्याचे आरोग्य आणि निरोगी केंद्रात रुपांतर करणार असून गोव्याला उच्च तंत्रज्ञान संशोधनासाठीचे केंद्र म्हणून विकसित करणार आहेत. शेतकरी उत्पादन संघटनांना राज्यील शेतकऱ्याचे उत्पादन दुपटे वाढविण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी १० लाख मदत भाजप मदत करणार आहे. गोव्यात मासेमारी उपक्रमाला पाठिंबा देणार असून गोव्याला सीफूडचा आघाडीचा निर्यातदार बनवणार असल्याचे ध्येय आहे. तसेच पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजकांना खास सुविधा देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.