Sun. Jun 20th, 2021

#SankalpPatra भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणाही केल्या आहेत. संकल्प पत्र असं या जाहीरनाम्याचे नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा जाहीरनामा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना एक सर्वात मोठी घोषणा केली आहे. लवकरात लवकर राम मंदिर उभारणार असे आश्वासन दिले आहे.

काय आहे नेमका जाहीरनामा ?

भाजपाच्या संकल्पपत्रात 75 संकल्पनाचा समावेश

देश झपाट्याने विकासाच्या दिशेने प्रवास करतोय

लवकरात लवकर राम मंदिर उभारणार

शेतकऱ्यांचा, ग्रामीण भागांचा विकास करणार

2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपट्टीनं वाढवणार

25 लाख कोटी ग्रामीण भागासाठी खर्च करणार

शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंत क्रेडिट कार्डच्या कर्जावर पाच वर्ष शून्य टक्के व्याज

छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन देणार

सर्व घरांमध्ये शौचालय असण्याचे लक्ष्य

व्यापारांसाठी राष्ट्रीय व्यापारी आयोग बनवणार

सर्व घरांमध्ये पिण्याचे पाणी शुद्ध पुरवणार

सहकार क्षेत्र मजबूत बनवणार

सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी ठोस पावलं उचलू

सर्व सरकारी कामं डिजीटल करणार

2022 पर्यंत रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करणार

सर्व जमीन रेकॉर्ड डिजीटल करणार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *