‘राज्य आणि देश महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही’

शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात जेसीबीद्वारे तोडण्यात आला. या सर्व प्रकाराचा तीव्र शब्दात विरोध केला गेला.
वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुन काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथील शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीद्वारे तोडण्यात आला.
यासर्व प्रकरणावरुन मध्य प्रदेशमधील भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनीही तीव्र शब्दात निषेध केला. तसेच शिवराज सिंह चोहान यांनी छिंदवाड्यातील सौंसरमध्ये जाऊन पदयात्रा काढली.
शिवराज सिंह चौहान यांनी याबद्दल एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच मध्यप्रदेश आणि राष्ट्र महापुरुषांचा अपमान सहन केलं जाणार नसल्याचं ही म्हणाले.
छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांनीही ट्विटद्वारे या प्रकरणाबाबतीत आपला संताप व्यक्त केला.