Thu. Jan 20th, 2022

पनवेल मनपा उपमहापौरपदी भाजपच्या सीता पाटील विजयी

पनवेल महानगरपालिका उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणूकीत पनवेल मनपा उपमहापौरपदी भापच्या सीता पाटील विजयी झाले आहेत.

पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपच्या जेष्ठ नगरसेविका सीता पाटील उपमहापौरपदी विजयी झाल्या आहेत. भाजपच्या सीता पाटील यांनी शेकापच्या प्रीती जॉर्ज यांचा पराभव केला आहे. सीता पाटील यांनी प्रीती जॉर्ज यांचा ५० विरुद्ध २७ मतांनी पराभव केला असून भाजपच्या सीता पाटील यांची पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी वर्णी लागली आहे.

पनवेल मनपा उपमहापौरपदाच्या निवडणुकीसोबतच स्थायी समिती सभापती, महिला बालकल्याण सभापती तसेच प्रभाग समिती सभापती पदांसाठीही निवडणूक कार्यक्रमदेखील पार पडत आहेत. कोरोनाच वाढत्या संसर्गामुळे या उमेदवारांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने मतदान केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *