Wed. Jun 29th, 2022

भाजपचे ‘टाहो आंदोलन’

मंगळवारी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची पावसाळापुर्वीची बैठक पार पडली. त्यात मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी करायला सांगितली आहे आणि त्याचबरोबर एनडीआरएफच्या ९ तुकड्या ७ जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात केल्या आहेत. त्यावरून आता भाजपाने कोल्हापूरात पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आक्रमक भूमिका घेत आज दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर टाहो मोर्चा काढला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्य सरकारला काम करण्याची इच्छाच नाही, पुरग्रस्तांना पुरेशी मदत दिलीच नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. येत्या २ ते ३ दिवसांत प्रशासनाने श्वेतप्रत्रिका प्रसिद्ध करून काय झाल्यास काय करणार आहात याची माहिती द्यावी.

गेल्यावर्षी सरकारकडून पुरग्रस्तांना तुटपूंजी मदत करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पुरग्रस्तांना तातडीने मदत केल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की,  २००५ नंतर प्रथमच २०१९ मध्ये महापुराचे संकट कोसळल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी पुरग्रस्तांना नियोजन करून मदत केली होती. घराचे नुकसान झाल्यास ९५ हजार, घर दुरुस्तीसाठी ५० हजार, दुकानदारांना ५० हजार, रोज ६० रुपये प्रमाणे निर्वाहभत्ता दिला होता. कपडे आणि भांडी वाहून गेल्यानंतरही मदत केली होती. २०१९ च्या महापुरातून २०२१ च्या महापुरासाठी तयारी करायला हवी होती, पण ती झाली नाही. त्यावेळची मिळालेली मदत ही तुटपूंजी होती.

चंद्रकांत पाटील यांनी संभाव्य पुरस्थिती लक्षात घेऊन काहीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप केला. महामार्गावरील पुर टाळण्यासाठी ५ कोटींची गरज आहे, पण यांची खर्च करण्याची तयारी नसल्याच चंद्रकांत पाटील म्हणाले. खर्च महामार्गावरील पुरस्थिती टाळता येईल, असे त्यांनी सांगितले. पुरस्थिती निर्माण झाली तर तेथील लोकांना कोणत्या ठिकाणी स्थलांतरित करणार? त्यांच्या औषधाचे काय, जनावरांना उंचीवर नेण्यासाठी काय करणार आहात ? असे प्रश्न या मोर्चामध्ये चंद्रकांत पाटील यांनी विचारले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.