Fri. Aug 12th, 2022

भाजपचा तिसरा उमेदवार

राज्यसभा निवडणुकांमध्ये चुरस निर्माण करत भाजपने तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. माजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांच्यापाठोपाठ भाजपने तिसरा उमेदवार उभा केला आहे. राज्यसभेच्या दोन जागेवर भाजपचे उमेदवार सहज निवडून येणार आहेत. आता कोल्हापूरचे नेते धनंजय महाडिक यांना भाजपने राज्यसभेचं तिसरं तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

संभाजीराजे छत्रपतींमुळे गाजलेल्या राज्यसभा निवडणुकीत आता सहाव्या जागेसाठी शिवसेनेतर्फे संजय पवार आणि भाजपतर्फे धनंजय महाडिक हे उमेदवार उभे करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील मंत्री यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवला. पण ते पुण्याला गेल्यानंतर सध्या या भागात पक्षाचे नेतृत्व कुणाकडे द्यायचे हा प्रश्न आहे. यातून महाडिक यांचे नाव पुढे आल्याची चर्चा आहे. राज्यसभेवर त्यांना पाठवून या भागात पक्षवाढीसाठी त्यांना ताकद देण्याचा पक्षाचा विचार आहे.

राज्यसभेसाठी सहा जागा निवडून देण्यात येणार आहेत. त्यातील वादग्रस्त सहाव्या जागेसाठी शिवसेनेने प्रथम संभाजीराजे यांना पसंती दिली होती. मात्र त्यांनी शिवसेनेत येण्यास नकार दिल्याने कोल्हापूरचे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली. या पाठोपाठ आता याच जागेसाठी भाजपने धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित केली आहे. तिसऱ्या जागेसाठी सोमवारी धनंजय महाडिकही यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.