Wed. Jul 28th, 2021

#PulwamaTerrorAttack :  17 फेब्रुवारीला ‘फिल्म सिटी’त ‘Black Day’

सिनेमांमधील कामासाठी पाकिस्तानी कलाकारांना देण्यात येणाऱ्या ऑफर्समुळे यांमुळे बॉलिवूडवर अनेकदा पाकिस्तानप्रेमाचा ठपका ठेवण्यात येतो.  बोनी कपूर, करण जोहर यांसारखे अनेक सिनेनिर्माते तसंच नसिरुद्दिन शाह, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांसारख्या कलाकारांच्या पाकिस्तानसंदर्भातील वक्तव्यांमुळे अनेकदा नेटिझन्सनी त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोपही केले. सोनम कपूर, फरहान अख्तर, शबाना आझमी, स्वरा भास्कर, महेश भट्ट यांसारख्या बॉलिवूडमधील अनेकजणांवर पाकिस्तानधार्जिणे असल्याची टीका होत असते. मात्र याच पार्श्वभूमीवर पुलवामा हल्ल्यानंतर बॉलिवूड भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ 17 फेब्रुवारी हा दिवस काळा दिवस म्हणून पाळणार आहे.

बॉलिवूड पाळणार ‘काळा दिवस’!

17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते 4 या वेळे दरम्यान बॉलिवूडने श्रद्धांजली अर्पण करण्याचं ठरवलं आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॅइज ( FWICE ) तर्फे सर्व बॉलिवूडला यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे.

सर्व स्टुडिओंमधील कामं, शूटींग, एडिटिंग तसंच संपूर्ण यंत्रणा 2 ते 4 ह्या वेळेदरम्यान थांबवण्यात येणार आहे.

2 तास सर्व काम थांबवून बॉलिवूड शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करेल.

एकता आणि सौजन्य दाखवण्याकरीता केलेला हा प्रामाणिक प्रयत्न असेल.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याविरोधात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॅइज ( FWICE ) चे सर्व सदस्य गोरेगाव फिल्मसिटीच्या बाहेर निषेध व्यक्त करणार आहेत.

सध्या फिल्म सिटीमध्ये सलमान खानच्या ‘भारत’ या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे.

तसंच अमितभ बच्चन, विरेंद्र सेहेवाग यांच्या जाहिरातीचंही या दिवशी शुटिंग आहे.

हे चित्रिकरण 2 तासांसाठी थांबणार आहे.

संबंधित बातम्या-

#PulwamaTerrorAttack : शहिदांच्या कुटुंबियांना या राज्यांकडून मदत

#PulwamaTerrorAttack: जवान तुझे सलाम

#PulwamaTerrorAttack : शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार – सीआरपीएफ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *