Sat. Jul 31st, 2021

दुर्गंधी, जनावरांचे अवशेष… ‘त्या’ घरात नेमकं काय सुरू होतं?

विरारधील एका घरामध्ये सुमारे 30 हून अधिक पाळीव प्राण्यांना क्रूरतेची वागणूक मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पाळीव प्राण्यांचा उपयोग जादूटोणा करण्यासाठी वापरत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी आई आणि तिच्या दोन मुलींविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात प्राणी क्रूरता अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरात हा एम-4 एव्हेन्यू इमारतीत घेतला.

या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन महिन्यापूर्वी शहनाज जानी ही 50 वर्षीय महिला आपल्या दोन मुलींसह भाड्याने राहण्यासाठी आली होती.

त्यावेळी या महिलेने आपल्याकडे दोन पाळीव प्राणी असल्याचे सांगितले होते.

मात्र या घरातून रात्री-बेरात्री कुत्रे मांजरी ओरडत असल्याचे आवाज येत होते.

सोसायटीच्या परिसरातही कुजलेली दुर्गंधी येऊ लागली.

अखेर रहिवाशांनी या घराची तपासणी केली.

 तपासणीत या गोष्टी आल्या समोर?

घराच्या तपासणीत लोकांना जे आढळलं ते भीषण होतं.

30 प्राण्यांना बंद घरात कोंडून क्रूरतेची वागणूक मिळत असल्याचं दिसलं.

संपूर्ण घरात प्राण्यांची विष्ठा आढळून आली.

प्रचंड दुर्गंधी येत होती.

तसंच मांजरी आणि कुत्र्यांच्या शरीराचे काही अवशेषही सापडले.

त्यानंतर सोसायटीच्या कचरापेटीची तपासणी केली असता त्यात 3 कुत्रे आणि मांजरीचे शरीर कुजलेल्या अवस्थेत आढळलं.

त्यामुळे हे कुटुंब या प्राण्यांचा वापर काळ्या जादूसाठी करत असल्याचा संशय रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

खरंतर विरार पश्चिम ग्लोबल सिटी हा उच्चभ्रू वस्तीचा परिसर ओळखला जातो. मात्र हा परिसर मागील काही वर्षांपासून विविध घटनांमुळे चर्चेचा विषय बनला आहे. या परिसरात हत्या, आत्महत्या, बलात्कार तसंच अपहरणाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच आता चक्क पाळीव प्राणी डांबून जादूटोणा करत असल्याचा आरोप येथील महिलेवर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *