Thu. Aug 13th, 2020

स्विस बँकेत काळा पैसा ठेवून निवांत बसलेल्यांची झोप उडवणारी बातमी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

स्विस बँकेत काळा पैसा ठेवून निवांत बसलेल्यांची आता झोप उडवणार आहे. स्वित्झर्लंड आणि भारताच्या करारारमुळे स्विस बँकेतल्या खात्यांची माहिती उघड होणार

आहे. त्यामुळे काळा पैसा भारतात येण्याची शक्यता आहे.

 

स्वित्झर्लंड आणि भारताचा ऑटोमॅटिक सूचना आदानप्रदान करार झाला. ज्या करारांप्रमाणे भारतीय लोकांची बँक खाती, त्यांची नावं आणि इतर महत्त्वाचे तपशील

भारताला मिळू शकणार आहेत.

 

स्वित्झर्लंड सरकार यासंदर्भातील एक कायदाच तयार करणार आहे आणि त्याद्वारे भारतीयांची कोणती खाती स्विस बँकेत आहेत त्यात किती पैसा आहे? हा पैसा

बाळगणारे खातेदार नेमके कोण आहेत ही सगळी माहिती केंद्र सरकारकडे सुपूर्द करणार आहे.

 

या करारावर स्वित्झर्लंडच्या मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केले आहे. 2018 पासून माहिती देवाण घेवाण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश स्वित्झर्लंड सरकारने

दिला. 2019 पासून काळा पैसा बाळगलेल्या सगळ्या भारतीयांची नावं केंद्राकडे यायला सुरूवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *