Fri. Aug 12th, 2022

‘तुझा नग्न व्हिडिओ दे, नाहीतर…’, Whatsapp वरून तरुणीला ब्लॅकमेल!

पुण्यामध्ये IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका Software Engineer तरुणीला Whatsapp वर एक भीषण मॅसेज आला. या मॅसेजमुळे ती अक्षरशः हादरून गेली. एका अनोळखी नंबरवरून आलेल्या या मॅसेजमध्ये तरुणीला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं.

नेमकं काय होतं मॅसेजमध्ये?

हिंजवडी परिसरात एका मोठ्या IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला Whatsapp वर मॅसेज आला.

मला तुझा 1 मिनिटांचा नग्न व्हिडिओ पाठव.

मी तो कुणालाही दाखवणार नाही.

माझा नंबर ब्लॉक करू नकोस.

माझ्याकडे तुझे private फोटो आहेत.

मला block केलंस, तर तुझे अश्लील फोटो मी मुंबईच्या Whatsapp ग्रुपवर पाठवेन.

पोलिसांत तक्रार केलीस, तर तुला बघून घेईन.

यानंतर, तरुणीला Whatsapp वर तिचा चेहरा आणि खाली अश्लील फोटो morph केलेला अश्लील फोटो पाठवण्यात आला.

हा फोटो तिच्या मित्रांमध्ये पसरवण्याची धमकीही तिला देण्यात आली.

 

या प्रकारामुळे तरुणी घाबरून गेली आणि तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस आता या प्रकरणी तपास करत आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचे अशा प्रकारे morphed फोटो पसरवण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. त्यावर कारवाई सुरू असते. मात्र अशाप्रकारे सामान्य तरुणींचेही अश्लील फोटो बनवून त्याआधारे तरुणींकडेच नग्न व्हिडिओंची मागणी झाल्याची घटना निश्चितच संतापजनक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.