Thu. Sep 29th, 2022

#SriLanka : आणखी एक स्फोट, स्टेशनवर सापडले 87 डेटोनेटर्स

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ईस्टरच्या दिवशी साखळी बॉम्बस्फोट झाले. ईस्टरच्या दिवशी 3 चर्च आणि 3 हॉटेलमध्ये एकापाठोपाठ हे बॉम्बस्फोट झाल्याने श्रीलंकेची राजधानी कोलंबो हादरली. यातचं आज पुन्हा श्रीलंकेत आणखी एक स्फोट झाला आहे.कोलंबोतील एका चर्च जवळील बॉम्ब निकामी करत असताना हा स्फोट झाला आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच कोलंबोच्या मुख्य बस स्थानकावर ८७ डेटोनेटर्स सापडल्याने श्रीलंकेत खळबळ माजली आहे.श्रीलंकेतील पेट्टा परिसरातील सेंट्रल कोलंबो स्टेशनवर मोठ्या संख्यने डेटोनेटर्स सापडले आहेत. या बॉम्बस्फोटात 300 जण ठार झाले असून 500 हून अधिक जखमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये 35 विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. याप्रकरणी श्रीलंका पोलिसांनी 24 संशयीत हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याची माहिती श्रीलंकन माध्यमांनी दिली.

श्रीलंकेत आज पुन्हा एक स्फोट

आज पुन्हा श्रीलंकेत आणखी एक स्फोट झाला आहे.

कोलंबोतील एका चर्च जवळील बॉम्ब निकामी करत असताना हा स्फोट झाला आहे.

यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तसेच कोलंबोच्या मुख्य बस स्थानकावर 87 डेटोनेटर्स सापडल्याने श्रीलंकेत खळबळ माजली आहे.

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात 300 जण ठार, 500 पेक्षा जास्त जखमी आहेत.

सर्वच्या सर्व सहा बॉम्बस्फोट हे आत्मघातकी स्वरुपाचे असल्याचं स्पष्ट झालं आहे.

एकुण 7 जणांनी तीन चर्च, तीन फाईव स्टार हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवले.

सातही सुसाईड बॉम्बर श्रीलंकेचे नागरीक असून एकाची ओळख पटली आहे.

नॅशनल तोहिद जमात या संघटनेचा या स्फोटामागे हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

श्रींलकेत मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.