Wed. Jan 19th, 2022

25 डिसेंबर रोजी कल्याण-डोंबिवलीकरांना सेंट्रल रेल्वेकडून ‘हे’ गिफ्ट!

ख्रिसमसच्या दिवशी सेंट्रल रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या नशिबी पुन्हा मेगाब्लॉक आहे. ठाकुर्ली येथे पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचं काम 25 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीदरम्यानच्या धीम्या आणि जलद मार्गांवर आणि 5 तसंच 6 नंबरच्या ट्रॅकवर ब्लॉक असेल.

25 डिसेंबर रोजी सकाळी 9.45 ते दु. 1.45 या काळात 400 मेट्रिक टन वजनाचे 6 मीटर रुंदीचे 4 गर्डर उभारण्याचं काम करण्यात येणार आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक 5 तास पूर्णपणे बंद राहणार आहे. Mega Block मुळे 16 मेल्स रद्द केल्या जाणार आहेत.

कशी असेल परिस्थिती?

या मेगा ब्लॉकमुळे सकाळी 9.45 ते दुपारी 1.45 दरम्यान कल्याण-डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद असेल.

कल्याण-कर्जत/कसारा या मार्गांवर दर 20 मिनिटांनी विशेष लोकल धावेल.

डोबिंवली-CSMT लोकल दर 15 मिनिटांनी धावेल.

CSMT- दादर, ठाणे ये लोकलच्या फेऱ्यांवर मात्र या मेगा ब्लॉकचा परिणाम होणार नाही.

दूरच्या पल्ल्याच्या या रेल्वे होणार रद्द

सिंहगड , CSMT-पुणे

डेक्कन क्वीन, CSMT-पुणे

पंचवटी, CSMT-मनमाड

राज्यराणी, CSMT-मनमाड

महालक्ष्मी, CSMT-कोल्हापूर

CSMT-भुसावळ पॅसेंजर

जनशताब्दी, दादर-जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *