Thu. Sep 19th, 2019

7 दिवस ‘पुणे-मुंबई एक्सप्रेस वे’ वर ब्लॉक!

0Shares

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचं (MMRDC)चं सध्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील धोकादायक दरडी हटविण्याचं काम सध्या सुरू आहे. 14 मे पासून सुरू झालेल्या या कामासाठी ‘एक्स्प्रेस वे’वर पुढील सात दिवस टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १४ ते १७ मे या दरम्यान, तर दुसऱ्या टप्प्यात २१ ते २३ मे या दरम्यान ब्लॉक असणार आहे. सकाळी दहा ते साडेचार वाजेपर्यंत प्रत्येक तासाला पंधरा मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर ब्लॉक!

पावसाळ्यामध्ये ‘एक्स्प्रेस वे’वर दरड, मोठे दगड कोसळून अपघाताचे प्रकार घडतात.

हे प्रकार टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पावळ्यापूर्वी MMRDC कडून धोकादाक दरड हटवण्याचं काम केलं जातं.

‘एक्स्प्रेस वे’वर तळेगाव टोलनाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला जोडणाऱ्या मार्गिकेवरील उर्से खिंड येथे दरड आणि मोठे दगड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

या कामासाठी पहिल्या टप्प्यात १७ मे पर्यंत तर, दुसऱ्या टप्प्यात २१ मे ते २३ मे दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या कालवधीमध्ये दररोज सकाळी १० ते साडेचार या वेळेत दर तासाला १५ मिनिटांसाठी दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविली जाणार आहे.

त्यामुळे प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

१४ ते १७ मे आणि २१ ते २३ मे या दरम्यान दररोज घेण्यात येणाऱ्या ब्लॉकचे वेळापत्रक

 

असे असणार ब्लॉक :

पहिला ब्लॉक : सकाळी १० ते १०.१५

दुसरा ब्लॉक : सकाळी ११ ते ११.१५

तिसरा ब्लॉक : सकाळी १२ ते १२.१५

चौथा ब्लॉक : दुपारी २ ते २.१५

पाचवा ब्लॉक : दुपारी ३ ते ३.१५

सहावा ब्लॉक : दुपारी ४ ते ४.१५

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *