Sat. Jul 31st, 2021

गोकुळाष्टमीला #BlockPeta जोमात, ‘हॅशटॅग’मुळे ‘पेटा’ कोमात!

प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश देणारी आणि प्राण्यांच्या रक्षणासाठी तत्पर असणाऱ्यापीपल्स फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स म्हणजेच PETA (पेटा) ही संस्था जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र गोकुळाष्टमीचा मुहुर्त या संस्थेसाठी तापदायक ठरणार असल्याचं दिसत आहे. कारण ट्विटर आणि फेसबुकवर #BlockPeta हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आलाय. या हॅशटॅगनुसार पेटा संस्थेलाच हद्दपार करण्याचा नारा हिंदू धर्मातील अनेकांनी दिलाय.

काय घडलंय नेमकं?

गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त दही दुधाच्या सढळ वापरावर पेटा संस्थेने वेगळं मत मांडलं आहे.

या सणाला दही दूध तूप वापरणं टाळून वनस्पती तूप वापरावं, असा संदेश पेटा संस्थेने दिलाय.

वनस्पती तूप बनवण्याचा विधीही त्यांनी आपल्या व्हिडिओमार्फत दाखवलाय.

जनावरांचं दही दूध तूप वापरल्यामुळे प्राण्यांना त्रास होतो.

म्हणून डेअरीमधील पदार्थांचा वापर टाळून उत्सव साजरा करावा असा संदेश पेटाने दिलाय.

वनस्पती तूप वापरल्यामुळे गायदेखील आनंदी होईल, असंही पेटा संस्थेने आपल्या संदेशात म्हटलं आहे.

 

 

मात्र या संदेशावर अनेक हिंदूंनी आपत्ती दर्शवली आहे. अनेकांच्या मते पेटा संस्था ही केवळ हिंदू उत्सवांनाच टार्गेट करते. यापूर्वीही पेटा संस्थेने बैलगाडा शर्यतीवर निर्बंध घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी पेटा संस्थेवर अनेक हिंदूंनी नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी जेव्हा बकरी ईद हा सण साजरा झाला, त्यावेळी पेटा संस्था कुठे असते? असा सवाल अनेकांनी केलाय. पेटाचं ऐकून आम्ही आमचे सण बंद करण्याऐवजी पेटा संस्थेलाच ब्लॉक करू असं म्हटलं आहे. त्यातूनच BlockPeta हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला. अनेक लोकांनी ट्विटरवर पेटाला ब्लॉक केलं आहे.

 

 

पेटा संस्था दुतोंडी असल्याचा अनेकांनी आरोप केला आहे. त्यामुळे जरी पेटा संस्थेने प्राण्यांच्या प्रेमापोटी दुग्धजन्य पदार्थ टाळण्याचा संदेश दिला असला, तरी तो लोकांना फारसा रूचला नसल्याचंच दिसून येतंय.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *