Sun. Jun 20th, 2021

फेसबुक बिसबुक

प्रेम, प्यार, मोहब्बतवर स्टेटस असतात तिचे म्हणजे तिचं नक्की काही तरी असणार… मला हसूच येतं अशा व्यक्तींचं..बिचारे… अशानेच अगदी सोशल मिडीयावरही कितीतरी मुली मनमोकळेपणाने व्यक्त होत नाही.. आपले पिक्स सुद्धा शेअर करायला घाबरतात… त्यांच्यावर दडपण असतं आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या जनरेशनचं… नाही माझे रिलेटीव्ह्स आहेत फेसबुकवर, ग्रुप पिक्स मी नाही करणार शेअर.. असं सगळं वरचेवर ऐकू येत असतं… हे असं तुम्ही फेसबूकवर टाकता करता, त्यामुळेच भलते प्रकार होतात, आणि क्राईम पेट्रोल, सावधान इंडियाची उदाहरणं सांगितली जातात आपल्यावर..

 

हा सगळा विचार केला की खरंच असं वाट्टं, सोशल मिडीयावरही वावरायला काहींना मोकळीक नाहीये, तरूणींवर तर दडपण असतं ते बदलतं जग स्विकारू न शकलेल्या पिढीचं… पण बदल होणारच.. कुणी अडवू शकणार नाही त्याला… अशावेळी आपल्या मागच्या पिढीला एकच सांगावसं वाट्टे, व्यक्त होण्याच्या या नव्या प्लॅटफ़ॉर्मला समजून घ्या, सोशल मिडीया, वर्च्युअल विश्वाविषयी अनेक समज-गैरसमज करून घेतले जातात. याविषयी असलेल्या अज्ञानामुळे हे होते.

 

डिजीटल इंडियाची भाषा करणारी ही पिढी आहे. या पिढीने मागच्या पिढीला सोशल मिडीयाच्या विश्वाविषयी माहिती करून देणं गरजेचं आहे. फेसबूक आणि व्हॉट्सअप किंवा इतर कुठल्या सोशल मिडीयावर कोणतीही माहिती शेअर करताना त्याचा ऑडिअन्स म्हणजेच ती माहिती कोण पाहू शकतं हे सेट करणं महत्त्वाचं असतं. एखाद्या पोस्टमध्ये आपण हवं त्या व्यक्तीला हाईड करू शकतो. किंवा एखादी पोस्ट पब्लिक म्हणजेच सगळ्यांनाच दिसेल अशी ठेऊ शकतो.

 

फेसबूक आणि व्हॉट्स अॅपवर अनोळखी व्यक्तींचे मेसेजेस येऊ शकतात. मात्र, ते ब्लॉक करण्याचा पर्याय आपल्या हाती आहे. ओळखीतले आणि मित्र अशा व्यक्तींचा फ्रेंडलिस्टमध्ये भरणा करतो. त्यावेळी आपण पोस्ट करत असलेल्या प्रत्येक पोस्ट या सगळ्यांना दिसत असतात. किंवा कुणी वॉच ठेऊनही असते. ही मुलगी काय आणि कशा प्रकारचं पोस्ट करते. मित्रमंडळी कोण आहेत? या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सोशल मिडीयावरील अॅक्टीव्हिटीज कराव्यात. जेणेकरून पुढे होणाऱ्या संभाव्य मानसिक त्रासाला बळी पडणार नाहीत.

 

शेवटी जगात वावरताना वर्च्युअल का असेना एक लेवल मेन्टेंन असणं गरजेच आहे. अगदीच कुठल्याही प्रकारची हरासमेंट होत असेल तर वेळीच आपल्या पालकांना, विश्वासातील व्यक्तींना प्रसंगी सायबर सेलला संपर्क करण्याचाही पर्याय उपल्बध आहे. मोकळेपणाने व्यक्त व्हा, आणि सोशल मिडीयावरही सुरक्षित राहा… सावधान इंडिया!

 

– गायत्री पिसेकर (जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई)

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *